👉भगवानगड व ४६ गावांसाठी मजुर योजनेचे भूमिपूजन भगवानगडाच्या पायथ्याशीच !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- भगवानगड व ४६ गावांसाठी मजुर योजनेचे ज्याला कोणाला श्रेय घ्यायचे ते घेऊ द्या, शेवटी सत्य समोर येत असते. योजनेमुळे उसतोड कामगारांच्या जिवणात आम्ही आनंदाचा क्षण देऊ शकलो, यांचे समाधान जास्त आहे. योजनेचे भूमिपूजन भगवानगडाच्या पायथ्याशी केले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले.
भगवानगड व ४६ गावांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मजुर करण्यासाठी अँड. ढाकणे यांनी पाठपुरावा केल्याने भगवानगड परिसरातील गावांतर्फे खरवंडी कासार येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशकंर राजळे, नगरसेवक बडुंशेट बोरुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख, दादासाहेब खेडकर, राष्ट्रवादीचे युवाध्यक्ष महारुद किर्तने, किरण खेडकर उपस्थित होते.
ॲड. ढाकणे म्हणाले, २००५ साली या योजनेबाबत आमची चर्चा सुरू झाली. याबाबत अंदोलन केले. आम्ही ग्रामसभेचे ठराव केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना याचे महत्व पटवून दिले. मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाणी पुरवठा विभागाला पत्र दिले. त्यामुळे चार महिण्यापूर्वी पुन्हा राजस्थानच्या एका एजन्सी मार्फत सर्व्हे केला. मोहटादेवी तारकेश्वर गडाचाही यात समावेश होत आहे. भगवान गडाच्या पायथ्याशीच भूमिपुजन होईल.
दरम्यान ॲड. ढाकणे यांचा खरवंडी, मालेवाडी, मिडसांगवी, भालगाव मुगंस्वाडे, एकनाथवाडी, काटेवाडी, ढाकणवाडी, जवळवाडीत सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र जगताप, विष्णु थोरात, राजेंद्र नागरे, दीपक ढाकणे, अजिनाथ दराडे, भगवान हजारे, अभिमान बडे, सुनील ढाकणे, अबांदास राऊत, विष्णुपंत खेडकर आदी उपस्थित होते.