संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील युवानेते तथा उद्योजक नितीनभाऊ बारगजे यांचा वाढदिवस बारगजे मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
श्री बारगजे यांच्या निवासस्थानी मित्र परिवार, नातेवाईक, सहकारी उद्योजक, राजकीय नेते यांच्या उपस्थितीत केक कापून,तसेच फटाक्यांची मोठी आतिषबाजी करत मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी पिपळगाव टप्पाचे सरपंच तथा नेते भावी जिल्हा परिषदेचे उमेदवार मेजर पांडुरंग शिरसाट , काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पोपटराव बडे, अनिल फुंदे, पप्पू शिरसाठ, उद्धव केदार, गहिनाथ बडे, उद्योजक विकास बडे, पेंटर गणेश बडे, बंडू बडे, पत्रकार सोमराज बडे , आनंद रंधवे, अजिनाथ अंबिलढगे, दिनकरराव पालवे आदींसह पाथर्डी, शेवगाव, अहमदनगरसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून युवानेते नितीन बारगजे यांना येणाऱ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दरम्यान विशेषतः मेजर शिरसाठ यांच्या हस्ते बारगजे यांचा फेटा ,शाल ,श्रीफळ,फुलांचा बुके देऊन यावेळी टाकळीमानूर गट, गणाच्या सर्व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बबन बडे, सहदेव बडे, सोमनाथ अंबिलढगे, विशाल वणवे, बाबासाहेब बडे, शिवनाथशेठ बडे, नवनाथ बडे, बबन खडागळे, गणेश गोसावीसर आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.