मेट्रो सिटीच्या स्वप्नपूर्तीसाठी लाडक्या भैय्याला पुन्हा संधी द्या – शितल जगताप
शितल जगताप यांचे लाडक्या बहिणींना आवाहन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर – विकासकामांनी आ. संग्राम जगताप यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. पूर्वीचे नगर आणि आताचे नगर शहर यात मोठा बदल झाला आहे. आ.संग्राम जगताप यांच्या मेट्रो सिटीची स्वप्नपूर्ती होण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या भैय्याला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी करून शहरातील महिलांनी २० नोव्हेंबरला कंटाळा न करता वेळ काढून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहन केले.
महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी प्रभाग ८ मधील विविध भागांमध्ये प्रचार फेरी काढून महिलांच्या बैठका घेतल्या. यावेळी मनीषा दातरंगे, शितल दातरंगे, रूपाली दातरंगे, शारदा दातरंगे, सुरेखा आगरकर, सुनिता दातरंगे, हिराबाई आंबेकर, चंदाबाई आंबेकर, माधुरी आगरकर, विजया दातरंगे, रंजना दातरंगे, मनीषा दातरंगे, अलका दातरंगे यांच्यासह दातरंगे मळा परिसरातील परिसरातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी शितल दातरंगे यांनी आ.संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामांची व राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती दिली. शहरातील रस्ते ड्रेनेज उद्याने पाणी प्रश्न आदी प्रश्न आ.जगताप यांनी सोडवले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या अनेक योजनांचा सुमारे एक लाख महिलांना लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे शहरातील सर्व महिला आ.जगतापांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना मंत्रिमंडळात पाठवल्याशिवाय या बहिणी गप्प बसणार नाहीत, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
———————————————