संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- मुख्यालयी राहण्याविषयी माहिती उपलब्ध नसताना पगार, घरभाडे भत्ता बेकायदेशीरपणे मंजुर करणाऱ्या पंचायत समिती, नेवासामधील दोषी अधिकाऱ्यांवर आणि घेणाऱ्या शिक्षक, ग्रामसेवक इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा, तसेच कांगोणी(ता. नेवासा) गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमधून अनधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या ग्रा.पं. कांगोणी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर आणि प.स. नेवासा मधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी आंदोलनाचे निवेदन दिले होते. परंतु त्यानुसार अजूनही दोषींवर कारवाई झालेली नसल्यामुळे तक्रारीनुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा जि.प.च्या कार्यालयासमोरील बेमुदत धरणे आंदोलन सुरू करीत असून या आंदोलनाची दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्ते गोरक्षनाथ त्रिंबक साळुंके, सोपान बाबासाहेब रावडे (मु.पो. कांगोणी ता. नेवासा जि. अहमदनगर) यांनी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या आंदोलनाला शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेटे पा. यांनी पाठिंबा दिला आहे.
जि.प.प्राथ शाळा कांगोणीतील मुख्याध्यापक, शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याच्या तक्रारीची जाणीवपूर्वक अर्धवट चौकशीचा खोट्या माहितीचा बनावट चौकशी अहवाल देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या पंचायत समिती नेवासामधील सर्व दोषी अधिकाऱ्यांवर आणि मुख्यालयी न राहणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. पंचायत समिती नेवासा कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारे सर्व शिक्षक, अधिकारी पंचायत राहतात किंवा नाही याबाबत असणारे पुरावे (भाडे करार स्वमालकीचे उतारे, ग्रामसभा ठराव, लेखी जवाब, ग्रा.प.दाखले) पंचायत समिती, नेवासा उपलब्ध नसताना त्या अधिकारी, कर्मचान्याचे परदेशीरपणे मंजूर करणा-या पंचायत समिति नेवासामधील सर्व दोषी अधिकार आणि बेकायदेशीरपणे पगार, परमामला घेणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक व इतर सर्व दोषी अधिकान्यावर गुन्हा दाखल करावा, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनमधून अनधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्या या ग्रामस्थांना द्या.पं. कागोणीकडून नोटिसा दिल्या त्या ग्रामस्थावर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना मदत करणान्या ग्रा.पं. कांगोणी आणि पं.स. नेवासातील दोषी अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अनधिकृत नळ कनेक्शनच्या तक्रारीचा शासनाची फसवणूक, दिशाभूल करणारा बनावट अहवाल तयार करून हुकुमशाही पद्धतीने तक्रार निकाली काढणाऱ्या पंचायत समिति, नेवासा मधील दोषी अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
निवेदनातील सर्व मागण्या शासनाच्या आणि समाजहिताच्या मागण्या असून संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य दखल घ्यावी, असे आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति विभागीय आयुक्त, नाशिक, जिल्हाधिकारी अहमदनगर, अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसिलदार नेवासा, गटविकास अधिकारी पंचायत समिती, नेवासा यांना पाठविण्यात आल्या आहेत.