मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस पाथर्डी तालुक्यात साजरा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोहटादेवी गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तसेच परिसरातल्या वाड्यावर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये व मूकबधीर विद्यालय कारेगाव येथे शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी मोहटादेवी येथे मोहटादेवीचे आशिर्वाद घेऊन मुख्यमंत्र्याला दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून महाराष्ट्राचा विकास होवो, ते परत मुख्यमंत्री होवा आई मोहटादेवीच्या चरणी प्रार्थना केली. त्याप्रसंगी अहमदनगरच्या पथम महिला महापौर शीलाताई शिंदे, नगरसेविका सौ.अश्विनीताई जाधव, वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हाप्रमख शिंदे ,तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते .
त्यामध्ये म्हातारदेव डांगे, नारायण शेकडे, सुरेश फुले ,जूते संदीप पालवे, महादेवभैय्या दहिफळे, माजी सरपंच महादेव दहिफळे, अर्जुन धायतडक, सतीश पालवे ,शेकटा गावचे सरपंच माऊली घुले, दत्तात्री खेडकर हे सर्व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पाथर्डी तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे यांनी छान प्रकारे केले होते.
तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे यांच्या अधिपत्याखाली तालुक्यात ठिक ठिकाणी मोहटादेवी गावातील जिल्हा परिषद शाळेतील मूकबधिर विद्यालय मोहटादेवी रोड येथील शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करून व महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान मोहटादेवी येथे मुख्यमंत्री साहेबांना उदंड आयुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली.