सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक |तयाचा हारीख वाटे देवा!!, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.व्यक्तीच्या जीवनात त्याचे आई वडील हे देव,गुरु,मार्गदर्शक म्हणून महत्वाचे काम करीत असतात. म्हणून आई-वडिलांचे पाद्यपूजा करणे हे प्रत्येक मुलामुलींचे परम कर्तव्य आहे.
काळाच्या ओघात हे संस्कार नष्ट होत चालले आहेत. नवीन पिढीला आपल्या सनातन भारतीय संस्कृतीविषयी माहिती करून देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणूनच जिल्हा परिषद शाळा मुखेकरवाडी (ता.पाथर्डी) येथे (दि.१४)रोजी मातृ-पितृ पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे बडे सर व शाळेतील शिक्षकांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक अण्णासाहेब नजन हे होते. अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती फुंदे या होत्या.
यावेळी ज्ञानेश्वर मुखेकर, कचरू मुखेकर, गणेश मुखेकर, अशोक रावतळे यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
दरम्यान मान्यवरांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक दादासाहेब कचरे यांनी केले. आभार विश्व हिंदू परिषदेचे संघटक देवा पवार यांनी मानले.