मुकुंदनगरात दहशत माजवणारे जेरबंद ; भिंगार पोलिसांची कारवाई

मुकुंदनगरात दहशत माजवणारे जेरबंद ; भिंगार पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : येथील मुकुंदनगर परिसरात दहशत माजवणा-यांच भिंगार कॅम्प पोलीसांनी बंदोबस्त केला. आदिल शेख उर्फ मुन्ना, आदनान आदिल शेख, अफनान आदिल शेख, हसनैन आदिल शेख, नाजीद साजीद सय्यद, साजिश सय्यद (सर्व रा. वावळे कॉलनी, मुकुंदनगर, ता.जि.अहिल्यानगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार प्रमोद लहारे, दीपक शिंदे, अंकुश कासार, इस्त्राईल पठाण, समीर शेख आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की ,दि. १३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.५० वाजण्याच्या सुमारास गौसिया मस्जिद मुकुंदनगर येथून फिर्यादी नमाज पठण करुन मस्जिदजवळ असलेल्या डायपर हाऊस दुकानासमोर, मुकुंदनगर, अहिल्यानगर येथे असताना आरोपी आदिल शेख उर्फ मुन्ना, आदनान आदिल शेख, अफनान आदिल शेख, हसनैन आदिल शेख, नाजीद साजीद सय्यद, साजिश सय्यद (सर्व रा. वावळे कॉलनी, मुकुंदनगर, ता. जि. अहिल्यानगर ) यांनी संगनमत करुन डोक्यात लोखंडी कोयत्याने व लोखंडी पाईपने व लाथाबुकक्यांनी मारहाण करुन गंभीर दुखापत करुन शिवीगाळ दमदाटी केली आहे. डायपर हाऊस नावाचे दुकानाचे व दोन दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केली आहे. तसेच दुकानातील रोख रक्कम व गळ्यातील चैन काढून घेऊन निघून गेले आहेत, या नाजिम मोहम्मद अली शेख (रा. मुकुंदनगर, ता.जि. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११९(१),११८(१),११५(२)३५२,३५१(२)(३),१८९,१९१(२)(३),१९०,३२४(२)(४)
सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी हे फरार झाले होते. गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना सपोनि जगदीश मुलगीर यांना तांत्रीक विश्लेषणाद्वारे माहीती समजली की, आरोपी हे गोविंदपुरा नाका येथे आलेले आहेत, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी तपास पथकातील अंमलदार यांना ठिकाणी तात्काळ जाऊन खात्री करुन कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे तपासी टीमने त्या ठिकाणी गेले. या दरम्यान आरोपींना पोलीस आल्याचा सुगावा लागताच ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!