मुकुंदनगरात तलवार बाळगणा-यास भिंगार कॅम्प पोलीसांनी घेतले ताब्यात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील मुकुंदनगर या भागात एकास तलवार बाळगणा-यास भिंगार कॅम्प पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अरमान नईम शेख वय 19 वर्षे रा गजानन कॉलनी, मुकुंदनगर अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे , नगर शहर डिवायएसपी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार पोसई किरण साळुंके, सफौ रेवननाथ दहिफळे, सफौ कैलास सोनार, पोहेकाॅ संदिप घोडके, पोहेकॉ दिपक शिंदे, पोहेकॉ अजय गव्हाणे, पोकॉ अमोल आव्हाड, पोकॉ समिर शेख, पोकाॅ कैलास शिरसाठ आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२८ जानेवारी २०२४ रोजी भिंगार पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांना माहिती मिळाली की, मुकुदंनगर येथील इंडिया बेकरीच्या पाठीमागे एक इसम त्याचे हातात धारदार तलवार अवैधरित्या घेऊन फिरत आहे, आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाली. सपोनि राजगुरु यांनी तात्काळ भिंगार कॅम्प् पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अंमलदार यांना माहिती देऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेशीत केल्याने भिंगार कॅम्प् पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अंमलदारांनी माहिती प्रमाणे ठिकाणी जाऊन सापळा रचून त्या संबंधितास हा पळून जाण्याचे तयारीत असतांना त्यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याचे हातात असलेली एक धारदार तलवार जागीच जप्त करण्यात आली. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अरमान नईम शेख (वय १९ रा गजानन कॉलनी, मुकुंदनगर अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं ६५/२०२४ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध खालील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.