संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अहमदनगर येथे तपोवन रोड स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र या ठिकाणी साई माऊली हॉस्पिटल व जय हिंद फाउंडेशन अहमदनगर जय भगवान महासंघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी साईबाबा हॉस्पिटलचे डॉ. तुकाराम गीते, गोरक्ष पालवे, रुद्र सरकार, प्रियंका गायकवाड, शायोनी हालदर, फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, एकनाथ खिल्लारी, बबन पालवे, राजीव भोसले, भाऊसाहेब देशमाने, गौरव गर्जे, पप्पू गर्जे, जय भगवान, महासंघाचे रमेश सानप, संजय आव्हाड, मदन शेठ पालवे, रघुनाथ औटी, ज्ञानेरा वामन, प्रमोद भिंगारे, यश ससाने, संदीपराव जावळे, अशोक गर्जे, विजयकुमार पालवे, रोहिदास पालवे, नगरसेवक नितीन शेलार, चंद्रकांत वायकर, अरुण पालवे, अंकुश पालवे, अक्षय पालवे, सोपान पालवे, अशोक पालवे, सुरेश साबळे, सौरभ साबळे आदि उपस्थित होते.

गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील जनसामान्य जनतेला खूप मोठा आधार होता जनसामान्यांसाठी मुंडे साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक योजना तळागाळापर्यंत राबवत होते आणि तरुणांना नोकरीसाठी मुंडे साहेबांचे माध्यमातून सहकार्य मिळायचे ऊसतोड मजुरांच्या व अठरापगड जातीच्या कार्यकर्त्यांचा आधार मुंडे साहेबांकडे पाहिले जायचे मुंडे साहेबांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी केले
आभार जय भगवान महासंघाचे अध्यक्ष संजय आव्हाड यांनी मानले.