संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
शिर्डी : माजी मुख्यमंत्री व शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत येऊन सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
उद्धव ठाकरे हे नेवासा येथील ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. प्रथम त्यांनी शनिशिंगणापूरला जाऊन श्री. शनि महाराजांचा अभिषेक करत श्री शनि महाराजांचे दर्शन घेतले. माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर उद्धवजी ठाकरे हे शिर्डीला आले. श्री साई समाधी मंदिरात जाऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. श्री साई संस्थानच्या वतीने उद्धव ठाकरे व सौ रेश्मीताई ठाकरे यांचा साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव हे उपस्थित होते.
संकलन : राजेंद्र गडकरी, शिर्डी