सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील माणिकदौंडी घाटात इथेनॉलचा टॅंकर पलटी झाला.या अपघातादरम्यान टॅंकरने पेट घेतल्याने आता बसलेल्या दोघांना बाहेर निघता न आल्याने मयत झाले, तर अन्य काहीजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.६जुलै) ११ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समजली आहे. गणेश रामराव पालवे (वय ४२ रा.पालेवाडी), सुरैया बशीर शेख (वय ४६ रा. माळी बाभूळगाव ता.पाथर्डी) असे दोन जण आगीत जळून मृत झालेल्याचे नावे आहेत. लहू सांडू पवार वय ५३, सुमन लहू पवार वय ४९, जगदीश जगन पवार वय ३, कोमल जगन पवार वय ७ (रा. विसरवाडी ता. पैठण) असे जखमीचे नावे आहेत.
गणेश पालवे हा या टँकरचा दुसरा चालक असून गणेश हा टँकरच्या डाव्या बाजूला बसलेला होता, त्याच बाजूने टँकर पलटल्याने तो टँकर खाली सापडला त्यामुळे चेहरा जळाला नसून उर्वरित शरीर आगीमध्ये जळून खाक झाले आहे. तर महिला पूर्णतः जळून खाक झाली आहे.गुरुवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याला वळणावर इथेनॉलने भरलेला टँकर उलटून अपघात झाला. त्यानंतर टँकरमधील पाच जण सुखरूप बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आले. तर टँकर चालवणारा मुख्य चालक दादासाहेब अंकुश केकाण टँकरमधून उडी मारून पळाला. गणेश पालवे व सुरैया बशीर शेख हे दोन जण टँकर मध्ये अडकल्याने त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.जखमींना पाथर्डीमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस हवालदार नितीन दराडे,राम सोनवणे,अल्ताफ शेख,सुहास गायकवाड, किशोर लाड, प्रल्हाद पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली.पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने टँकरची आटोक्यात आणून आग विझवली. त्यानंतर पोलिसांनी आगीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींची ओळख पटवून नावे निष्पन्न केले. टँकरचा मुख्यचालक दादासाहेब केकाण याचा पोलीस शोध घेत आहे.