माझी कितीही बदनामी करा लोक माझ्या बरोबर आहे ः शिवाजीराव कर्डिले

राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिलेंनी गाव भेट दौर्‍यानिमित्त मिरी परिसरातील नागरिकांची संवाद साधला

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी ः जिरायत भागातील प्रश्नांची जान असल्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दूध धंदा व्यवसाय करण्यासाठी चार गाय खरेदीसाठी 3 लाख रुपयाचे कर्ज देण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यथा मला माहित आहे राहुरी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये कुठलेही विकासाचे भरीव काम मार्गी लावू शकले नाही. सत्ता असताना मंत्री पदाच्या काळात वांबोरी चारी टप्पा दोन चे काम मार्गी लावले नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावला लवकरच त्याचे काम देखील सुरू होणार आहे. पावसाने भरलेल्या तलावांचेच जलपूजन करण्याचे काम त्यांनी केले माझी निवडणूक मतदार संघातील जनतेने हातात घेतली असल्यामुळे त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आता बिनबुडाचे आरोप करत सुटले आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असून आमच्यावर दहशत गुंडगिरीचे आरोप करत आहे. मात्र जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही मी 15 वर्षांमध्ये राहुरी पाथर्डी या भागात कधी कोणावर दहशत दादागिरी केली का हे दाखवून द्यावे राहुरी नगरपालिकेची सत्ता गेली 40 वर्ष त्यांच्याकडे आहे. त्यांनी सत्तेच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या जमिनीवर आरक्षण टाकली आणि कवडी मोलाच्या किमतीत खरेदी केली आणि शासनाकडून ते आरक्षण उठवली जातात, तुम्ही काय दिवे लावतात हे जनतेला माहित आहे माझी कितीही बदनामी करा लोक माझ्या बरोबर आहे. पाथर्डी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने पुढे येऊन मला निवडणुकीसाठी आर्थिक मदत देत आहे, मी केलेल्या कामाची पावती मिळत असल्याची प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले
राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी गाव भेट दौर्‍या निमित्त मिरी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी मा. सभापती संभाजी पालवे, अनिल गीते, वैभव खलाटे, शिवाजी पालवे, एकनाथ आटकर, शिवाजी घोरपडे, पोपट कराळे, प्रमोद गाडेकर, अशोक मिसाळ, किरण ससे, साहेबराव गवळी, पोपट गवळी, नाथा गवळी, अनिल शिंदे, यशवंत गवळी, सर्जेराव सोलत, संजय मोहिते, अशोक दहातोंडे, आप्पासाहेब वांडेकर, शिवाजी जाधव, रघुनाथ खाडे, भीमराव मचे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!