माजी सैनिकासह मुलाला‌ मारहाण ; पाथर्डी पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी ‌:
शेतामध्ये इलेक्ट्रीक पोल लावण्याच्या कारणावरून माजी सैनिकासह त्यांच्या मुलावर कुर्हाड, लाकडी काठी व गजाने हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांना जखमी केले. माजी सैनिक भाऊसाहेब दगडू आढाव (वय ६५) व त्यांचा मुलगा हर्षल भाऊसाहेब आढाव (दोघे रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर नगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


बुधवार (दि. ८) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शिराळ (ता. पाथर्डी) शिवारातील आढाव यांच्या शेत जमिनीमध्ये ही घटना घडली. जखमी भाऊसाहेब आढाव यांनी उपचारादरम्यान पाथर्डी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अर्जुन लहानु गोरे, बाबासाहेब गंगाधर बेल्हेकर, बाबासाहेब अर्जुन गोरे, भाऊसाहेब अर्जुन गोरे, बबन श्रीपदी दारकुंडे (सर्व रा. शिराळ) यांच्याविरूध्द भादंवि कलम ३२६, ३२५, ३२४, ३२३, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब आढाव यांची शिराळ शिवारात शेत जमिन असून त्यामध्ये अर्जुन गोरे याने भाऊसाहेब यांना न विचारता विहिरीचे खोदकाम केले आहे. यासंदर्भात भाऊसाहेब यांनी पाथर्डी न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान भाऊसाहेब हे शनिवार, ४ मार्च रोजी शेतामध्ये गेले असता त्यांना शेतामध्ये इलेक्ट्रीक पोल लावलेले दिसले. त्यांनी यासंदर्भात मिरी इलेक्ट्रिक सबस्टेशनकडे तक्रार दिली होती.

भाऊसाहेब व त्यांचा मुलगा हर्षल बुधवार, ८ मार्च रोजी सकाळी शेतामध्ये गेले असता इलेक्ट्रीक पोलजवळ अर्जुन गोरे, बाबासाहेब बेल्हेकर, बाबासाहेब गोरे, भाऊसाहेब गोरे, बबन दारकुंडे होते. अर्जुन गोरे याने माजी सैनिक भाऊसाहेब आढाव यांच्यावर कुर्हाडीने डोक्यावर वार केला असता त्यांनी तो चुकवला असता त्याच्या बोटाला लागून ते तुटले आहे. त्याच वेळी इतरांनी भाऊसाहेब व त्यांचा मुलगा हर्षल यांच्यावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये ते दोघे जखमी झाले. त्यांच्या मोबाईलवर दगड घालून नुकसान केले आहे. जखमींवर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास अंमलदार भिंगारदिवे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!