मांजरी शिव हद्दी वृद्ध महिलेचा खून

मांजरी शिव हद्दी वृद्ध महिलेचा खून
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहुरी : तालुक्यातील राहुरी मांजरी शिव हद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये दि. १३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान सुमन सावळेरराम विटनोर (रा. मांजरी, वय ६७) वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली.


मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर, भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळेरराम विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या उशिरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळेरराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अंगावरील सुमारे ४ तोळे सोन्याचे दागिने हे देखील ओरबडले असल्याचे माहिती मिळाली. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये, म्हणून चेहरा देखील जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे. सुमन सावळेरराम विटनोर यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी बसवराज शिवपूजे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, अमित राठोड, दीपक फुंदे आदी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले. यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमळले.
सुमन सावळेरराम विटनोर यांची हत्या झाली का? हत्या झाली असेल तर ती कोणी केली. हत्येपूर्वी त्यांच्या बरोबर नेमके काय घडले? याचा तपास पोलिस पथकाकडून सुरु आहे. या घटनेची तालुक्यात चर्चा सुरु आहे.पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून पथक तपास करीत आहे आरोपी लवकरच पकडू असे पोनि निरीक्षक ठेंगे यांनी सांगितले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!