👉पाथर्डी तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण करा, अन्यथा … माजेल!
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
Ahemnagar -पाथर्डी :- पाथर्डी तालुक्यात यापूर्वीच तीन खूनांच्या गंभीर घटना घडल्या आहेत. यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाली आहेत. या भयावह परिस्थितीत एका महिलेवर अतिप्रसंग करून जातीवाचक शिवीगाळ केली होती, या घटनेचा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. तो दाखल गुन्हा मागे घे, अन्यथा तुला दाखवतो, असा दम दिल्याची तक्रार पाथर्डी पोलिस ठाण्यात एका महिलेने नोंदवली आहे. रोहिदास लक्ष्मण मोरे (रा.वैजु बाभूळगाव) या नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार ही पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल आहे. तक्रार दाखल असताना संबंधित मोकाटच असल्याने अनेकांनी पाथर्डी पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. Crmie News
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभूळगाव येथे दि.१३ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. यात तक्रारदार महिलेने रोहिदास लक्ष्मण मोरे (रा.वैजु बाभूळगाव) यास आमच्या शेतातील विहिरीचे पाणी का घेतले?, अशी विचारणा केली. या दरम्यान मोरे हा तक्रारदार महिलेस म्हणाला की, तू मला कोण विचारणारी, असे म्हणत त्याने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यापूर्वी दोन ते तीन महिन्यांपूर्वी मोरे याने तक्रारदार महिलेवर अतिप्रसंग करून जातीवाचक शिवीगाळ केली होती. यावेळी ही तक्रारदार महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात मोरे याच्यावर गुन्हा दाखल केला होता. हा दाखल गुन्हा तू मागे घे, अन्यथा तुला दाखवतो, असे म्हणून मोरे याने पिडित तक्रारदार महिलेस दम दिला. याविरोधात महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दिल्यानंतर रोहिदास मोरे याच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंग, ॲट्रॉसिटी गंभीर गुन्हे दाखल तरी आरोपी मोकाट ; कायदा सुव्यवस्थेचा वचक निर्माण व्हावा
तक्रारदार महिलेस लाथाबुक्क्यांने मारहाण करून जीवे ठार मारण्याची दिली धमकी, विनयभंग ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे संबंधितावर तातडीने कारवाई केली पाहिजे, पण असे असतानाही आरोपी मोकाट आहे. यामुळे पाथर्डी पोलिसांच्या एकंदरीत कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.
कायदा सुव्यवस्थेचा वचक तालुक्यात निर्माण होण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांना सिंघम स्टाईलने कारवाया कराव्या लागतील नाहीतर, … माजेल!, यासाठी पाथर्डीत कायद्याचा वचक बसण्यासाठी गुन्हेगारांवर कायदेशीर कडक कारवाई व्हावी, अशी अपेक्षा पाथर्डी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.