महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना प्रा.शशिकांत गाडेंचा जाहीर पाठिंबा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर: अहमदनगर शहर मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवार अभिषेक कळमकर यांना जाहीर पाठिंबा असल्याचे शिवसेनेचे नेते तथा अपक्ष उमेदवार प्रा.शशिकांत गाडे यांनी खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.५ नोव्हेंबर २०२४) आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केला . यावेळी खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार दादाभाऊ कळमकर, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर, शिवसेनेचे विक्रम राठोड, पदाधिकारी संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, काॅंग्रेसचे किरण काळे, दिलीप सातपुते, नगरसेवक योगिराज गाडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.