महाराष्ट्र राज्य एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे वतीने निवेदन

महाराष्ट्र राज्य एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे वतीने निवेदन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे –महाराष्ट्र राज्य एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे वतीने पुणे येथील महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांना पदमशली समाजाच्या वतीने एसबीसीबाबत शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे राज्य संघटक आणि पुणे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांचानी आणि सचिव किशोर चंदावरकर,तेलंगणा येथील माजी खासदार आनंद भास्कर रापोलू, पद्मशाली पंच कमिटी पुणे शहरचे अध्यक्ष संजीवशेठ मंचे , अहिल्यानगर पदमशाली पंचकमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये , नितीन जुजगर, तिरमलेश पासकंटी, विजय रच्चेवार, विलास भाऊ जिंदम , अभिषेक सापा , जयकुमार बैरी, अरुण अमृतवाड , श्रीनिवास सैबी, जगन्नाथ बिन्गेवार, ॲड. राजु गाली, पुरषोत्तम बुरा, गणेश चेन्नुर आदी उपस्थित होते.
दि. ५ मार्च ते ९ मार्च २०२५ पर्यंत एसबीसी अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यासाठी साखळी उपोषण व धरणे आंदोलन पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जितेंद्र कांचानी व सुरेश पद्मशाली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पद्मशाली समाजाच्या वतीने हे धरणे आंदोलन व साखळी उपोषण चालू आहे तसेच सोलापूर, नांदेड, संगमनेर, अहिल्यानगर भिवंडी, मुंबई व इतर शहरातील समाज बांधवांनी त्या त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांना एसबीसी आरक्षणाबाबत निवेदन देऊन धरणे आंदोलन एक दिवशीय केले आहे.
साखळी उपोषण व धरणे आंदोलन पुणे येथे ९ मार्च पर्यंत करावयाचे ठरले असल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा व तालुक्यातील पद्मशाली समाज बांधवांनी व एसबीसीमध्ये येत असलेल्या जातीतील समन्व्यकांनी पुणे येथे येऊन आपला सहभाग नोंदवून पाठिंबा जाहीर करावा, असे आवाहन जितेंद्र कांचनी व सुरेश पद्मशाली यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!