महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर यांच्या वतीने 67 वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण

महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर यांच्या वतीने 67 वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांना दिली महिंद्रा थार गाडी भेट
नगर शहरामध्ये हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल : आ.संग्रामभैय्या जगताप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल घडावे यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे करणार आहे. कुस्ती खेळाच्या माध्यमातून विचारातून प्रेरणा मिळत असते, त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नसतात, प्रेक्षकही चांगले विचार घेत असतात, मोहोळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते. 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला असून त्याने आपले कर्तव्य सिद्ध केले. राज्यभरातून आलेल्या पैलवानांची काळजी घेण्याचे काम कुस्तीगीर संघाने केले आणि चांगल्या कुस्त्या संपन्न झाल्या, जिद्द, चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असते. भविष्य काळामध्ये नगर शहरांमध्ये हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे. यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या व्हावेत अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व आ.संग्रामभैय्या जगताप यांनी केले.


महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर यांच्यावतीने 67 वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आ. अरुणकाका जगताप, उपाध्यक्ष व आ. संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, पै. महेंद्र गायकवाड, हिंदकेसरी योगेश दोडके, राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा. माणिकराव विधाते, मार्गदर्शक विलास कथोरे, पै. गुलाब बर्डे, बबन काशीद, अनिल गुंजाळ, संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण, शिवाजी कराळे, निखिल वारे, उद्योजक राजेश भंडारी, गणेश गुंडाळ, सत्यम गुंदेचा, सुरेश बनसोडे, काका शेळके, अजय चितळे, युवराज पठारे, संजय ढोणे, देवा शेळके, युवराज करंजुले, निलेश मदने, बाळासाहेब जगताप, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, मनीष साठे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक कार्याध्यक्ष भुजबळ यांनी केले तर निलेश मदने यांनी स्वागत केले आणि उपाध्यक्ष पै. शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.

67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमधील गादी गटातील विजेत्या पैलवारांना महिंद्रा थार बुलेट स्प्लेंडर व सोन्याचे अंगठी देण्यात आली.
यावेळी 57 वजन गटामध्ये प्रथम क्रमांक वैभव पाटील, द्वितीय क्रमांक शुभम अचपळे, तृतीय अविराज माने, रोहित पाटील,
61 वजन किलो गटामध्ये प्रथम क्रमांक अजय कापडे, द्वितीय पुरुषोत्तम विसपुते, तृतीय क्रमांक पवन डोन्नर, पांडुरंग माने,
65 किलो वजन गटात प्रथम क्रमांक ज्योतिबा आटकळे, द्वितीय क्रमांक मनीष बांगर, तृतीय क्रमांक आकाश नागरे, किरण सत्रे,
70 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक सौरभ पाटील, द्वितीय क्रमांक सत्ताप्पा हिरगुडे. तृतीय क्रमांक विपुल थोरात, विकास करे
74 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक आदर्श पाटील, द्वितीय क्रमांक दयानंद पाटील, तृतीय क्रमांक योगेश्वर तापकीर, धैर्यशील लोंढे
79 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक शुभम मगर, द्वितीय क्रमांक केतन घारे, तृतीय क्रमांक संदीप लटके, सुजित यादव
86 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मुंतजीर सरनोबत, द्वितीय क्रमांक महेश फुलमाळी, तृतीय क्रमांक स्वप्निल काशीद, गौतम शिंदे
92 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक श्रेयश गाट, द्वितीय क्रमांक अभिजीत भोईर, तृतीय क्रमांक मोईन मुलानी, ऋषिकेश पाटील
97 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक कालीचरण सोलनकर, द्वितीय क्रमांक बाळू बोडके, तृतीय क्रमांक ऋतुराज शेटके, ओंकार येळभर, आदींचा समावेश आहे, तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांना महिंद्रा थार ही गाडी भेट देण्यात आली

67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमधील माती गटातील विजेते पैलवान

57 किलो वजन गटात प्रथम क्रमांक सौरभ इगवे, द्वितीय क्रमांक दिग्विजय पाटील, तृतीय क्रमांक ओंकार निगडे,

61 किलो वजन गटात प्रथम क्रमांक सुरज अस्वले, द्वितीय क्रमांक स्वरूप जाधव, तृतीय क्रमांक अमोल वालगुडे, ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक सद्दाम शेख, द्वितीय क्रमांक अनिकेत मगर, तृतीय क्रमांक शनिराज निंबाळकर,
70 किलो वजन गटात प्रथम क्रमांक तुशांत, देशमुख द्वितीय क्रमांक निखिल कदम, तृतीय क्रमांक कुलदीप पाटील, 74 किलो वजन गटात प्रथम क्रमांक अक्षय चव्हाण, द्वितीय क्रमांक निलेश हिरगुडे, तृतीय क्रमांक सौरभ शिंदे,
७९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक संदेश शिपकुळे, द्वितीय क्रमांक ऋषिकेश शेळके, तृतीय क्रमांक नाथा पवार, ८६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक चंद्रशेखर गवळी, द्वितीय क्रमांक हनुमंत पुरी, तृतीय क्रमांक सुनील जाधव,
९२ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक विश्वचरण सोलनकर, द्वितीय क्रमांक श्रीनाथ गोरे, तृतीय क्रमांक अंगद बुलबुले.
97 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक रोहन पवार, द्वितीय क्रमांक विजय बिचकुले, तृतीय क्रमांक अर्जुन काळे, 125 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून कोणतेही नाव आलेले नाही, द्वितीय क्रमांक साकेत यादव, तृतीय क्रमांक सुहास गोडगे यांना सन्मानित करण्यात आले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!