👉येत्या सात दिवसांत आपण अभिनव आंदोलन करणार असल्याचा ॲड प्रताप ढाकणे यांचा इशारा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : विशाखापट्टणम महामार्गावर पाथर्डी ते फुंदे टाकाळी, यासह अन्य ठिकाणी मोठमोठी खड्डे पडल्याने खड्ड्यात महामार्ग अशी वास्तव परिस्थिती पाहण्यास मिळते. या परिस्थितीमुळे अनेक छोटे मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. यासह भयावह परिस्थितीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजेत. सहा वर्षांपासून सुरू असलेल्या विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम महामार्गावरील पाथर्डी ते फुंदे टाकळी या दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गाचे काम तातडीने व्हावे, यासाठी येत्या सात दिवसांत आपण अभिनव आंदोलन करणार असल्याचा इशारा पाथर्डीचे नेते तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲड.प्रतापकाका ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी पाथर्डी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, रफिक शेख, इसाक शेख, संतोष जिरेसाळ, माऊली केळगंद्रे, रमेश कचरे, बंडू बोरुडे, भाऊसाहेब धस, योगेश रासने, बाळासाहेब गर्जे उपस्थित होते.
श्री ढाकणे असे म्हणाले, की आंदोलनाचे ठिकाण, वेळ व हे आंदोलन कशा पद्धतीचे असेल, हे आम्ही जाहीर करणार नसलो,या आंदोलनाची दखल प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. या महामार्गावर आतापर्यंत ३०० जणांना अपघाती मृत्यूआला असून, त्यांचे स्मरण करून हे आंदोलन केले जाणार आहे.
नगर ते पाथर्डी एक किलोमीटरमध्ये २५ पेक्षा अधिक खड्डे तयार झाले असून, यापेक्षा पूर्वीचा रस्ता चांगला होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या पद्धतीने काम चालू आहे. दुर्दैवाने या कामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतात. खासदार सुजय विखे यांनी येत्या तीन महिन्यांत हे काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले असल्याचे निदर्शनास आणले असता, यात तरीही आपल्याला कोणतेही राजकारण करायचे नसून हे काम त्यांनी दिलेल्या वेळेत केले तर आम्ही त्यांचा सत्कार करू, असे ते म्हणाले.