महापौरपद निवडीबाबत वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य : दिलीप सातपुते





संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या बैठकीत ; शिवसेना नगरसेवकांनी दाखवली एकजूट 
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर : येऊ घातलेल्या महापौर पदाच्या निवडीबाबत वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य असेल असा एकमुखी निर्णय शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत झाला, अशी माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते  यांनी दिली.          
 अहमदनगर महानगर पालिकेच्या विद्यमान महापौर पदाची मुदत येत्या ३० जून रोजी संपत आहे. तत्पूर्वी नवीन महापौर पदाची निवड होणे अपेक्षित आहे. यावेळी महापौरपदाची जागा ही अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या जागेसाठी नगर महापालिकेत दावेदार एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत. त्यामुळे या पदासाठी भाजप व बसपा  वगळता सर्वच पक्षात इच्छुक आहेत. शिवसेनेत देखील सौ रोहिणी संजय शेंडगे आणि सौ . रिटा भाकरे या दोन उमेदवार या पदाच्या दावेदार आहेत. यामुळे शिवसेनेत या दोनही उमेदवारांनी पक्षात वरिष्ठांकडे उमेदवारीचा हट्ट धरला होता. तेव्हा शिवसेना नगर दक्षिणचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर हे नगर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत हॉटेल यश ग्रॅन्ट येथे शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात सर्वांची मते जाणून घेण्यात आली.      मागील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता पालिकेत कोणत्याही परिस्थितीत शिवसेना नगरसेवकांनी आपली एकजूट ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच महापौर पदाच्या निवडीबाबत शिवसेना पक्ष प्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सरचिटणीस अनिल देसाई , खा. संजय राऊत , मिलिंद नार्वेकर तसेच इतर पक्षश्रेठी जो आदेश देतील त्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल असा निर्णय सर्वानुमते झाला. या पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहेत.  त्यामुळे आता या पदावर दावा शिवसेनेचाच आहे. आणि राज्यात महा आघाडीचे सरकार असल्याने सेनेचा महापौर होण्याबाबत आग्रह धरणार असल्याचे भाऊ कोरगावकर यांनी सांगितले. 

 मागील आठवड्यात शिवसेनेचे एक शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील यावेळी महाआघाडीच्या माध्यमातून महापौर शिवसेनेचाच करू असे सुतोवाच केले होते. त्यामुळे आता शिवसेनेचा महापौर होण्यास कोणताही अडसर राहिलेला नाही असे मला वाटते असे कोरगावकर म्हणाले.

 यावेळी प्रथम महापौर व उप जिल्हा प्रमुख भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मदन आढाव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे, उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. 



Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,000SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!