ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथकांच्या वतीने आयुक्त शंकर गोरे, उपयुक्त यशवंत डांगे, कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांच्या मार्गदर्शनाखाली कापड बाजार, दाळमंडई, आडतेबाजार, सराफ बाजार, नवीपेठ, सर्जेपुरा भागात कोरोना नियमावली संदर्भात व्यापारी, दुकानदार , खाजगी आस्थापना यांना सूचना देऊन लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी केली.ज्या खाजगी आस्थापणांनी लसीकरण केले नाही त्यांनी त्वरित लसीकरण करावे अन्यथा उद्या पासून लसीकरण केले नसलेल्या आस्थापना मध्ये RTPCR चाचण्या करण्यात येतील अशी सूचना देण्यात आली.
यावेळी विनामास्क दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी दक्षता पथकातील नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, राजेंद्र बोरुडे, अमोल लहारे, भास्कर आकुबत्तीन, विष्णू देशमुख, राजू जाधव, राजेश आनंदश्री. दीपक सोनवणे, गणेश वरुटे, रिजवान शेख, अमित मिसाळ, नंदकुमार रोहकले, भीमराज कांगुडे, गणेश धाडगे, भाऊ भाकरे, अनिल कोकणे उपस्थित होते.