शिवसेनेच्यावतीने ‘मशाल’ चिन्हाची मिरवणूक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – शिवसेनेने नेहमीच जनतेच्या कामासाठी संघर्ष केला, ही स्व. बाळासाहेबांची शिकवण आजही शिवसैनिक काटेकोरपणे पालन करत आहे. चिन्ह कोणतेही असले तरी शिवसैनिक हा त्यांच्या कामातून आपले कर्तुत्व सिद्ध करत असतो. सध्याच्या घडामोडीमुळे धनुष्यबाण चिन्ह तात्पुरते गोठविण्यात आले असले तरी सध्या दिलेले मशाल हे चिन्ह शिवसेनेच्या कार्याला साजेल असेच आहे. जनतेच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम ही मशाल करेल, असा विश्वास शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटास मशाल चिन्ह मिळाल्यानंतर नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेच्यावतीने ‘मशाल’ पेटविण्यात येऊन शहरातून रॅली काढण्यात आली. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, अभिषेक कळमकर, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, शाम नळकांडे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, संग्राम कोतकर, परेश लोखंडे, अशोक दहिफळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, शिवसेनेने नेहमीच समाजकार्यास प्राधान्य दिले आहे, त्यामुळे शिवसेनेची जनसामान्यांत चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा शिवसेनेवर मोठा विश्वास आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ‘मशाल’ हे चिन्ह शिवसेनेला मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. यापुर्वीही शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत, त्यामुळे हे चिन्ह शिवसैनिकांसह सर्वसामान्यांना प्रेरणा देईल, असे सांगितले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ढोल ताशांच्या गरजरात या मिरवणुकीची ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीची नेता सुभाष चौक येथे सांगता करण्यात आली.
यावेळी शरद कोके, सोपानराव कारखिले, मुन्ना भिंगारदिवे, अरुण झेंडे, अण्णा घोलप, भाकरे महाराज, गौरव ढोणे, श्रीकांत चेमटे, विठ्ठलराव जाधव, दिपक कावळे, रमेश खेडकर, आंबादास शिंदे, सुमित धेंड आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.