चांगल्या कारभारामुळे मराठा पतसंस्थातील सत्ताधार्यांनी वर्चस्व राखले – गणेश कवडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – मराठा नागरी सहकारी पतसंस्थाने गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले आहे. पतसंस्था विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक नियोजनाबरोबरच मदतीचा हात देण्याचे काम करत आहे. संचालक मंडळाच्या चांगल्या कारभारामुळे सत्ताधार्यांनी आपले वर्चस्व राखले आहे. इंजि विजयकुमार ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थांची कामगिरी हि दिवसेंदिवस उंचावत चालली आहे. या निवडून आलेल्या सर्व संचालकांना आमचे कायम सहकार्य राहील असा विश्वास मनपा स्थायी समिती चे सभापती गणेश कवडे यांनी व्यक्त केला.

अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्था निवडणुकीमध्ये निवडून आलेले नूतन संचालक यांचा मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्याहस्ते मनपा येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन संचालक सतीश इंगळे, उदय अनभुले, किशोर मरकड ,बाळासाहेब काळे, द्वारकाधीश राजेभोसले , लक्ष्मण सोनाळे , राजेश्री शितोळे ,कल्पना ठुबे, ॲड राजेश कावरे आदींसह इंजि सुरेश इथापे, अमोल लहारे, विजय नवले, सतीश दारकुंडे, अमोल सुरसे, राधेशाम धूत, ॲड. केदारनाथ राजेभोसले, सुधाकर भोसले, रवींद्र शितोळे आदी उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना किशोर मरकड म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करतांना अनेकांशी संबंध येत असतात. सर्वांच्या सहकार्याने विविध संस्थांवर काम करण्याची संधी मिळत आहे. आताही मराठा पतसंस्था च्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करण्याचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले .
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि सुरेश इथापे,सतीश इंगळे, उदय अनभुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमोल लहारे यांनी केले तर आभार राधेशाम धूत यांनी मानले.