संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार सुरू आहे. कचरा उचल्यानंतर तो ट्रलीमध्ये झोकून नसल्याने तो घेऊन जाताना रस्त्यावरच पडलेल्या अवस्थेत होता. त्या कचरा असलेल्या ओझ्याचे ये-जा करणा-या नागरिकांना लक्ष्मीबाई कारंजा चौकात रविवारी अडचण नसून खोळंबा झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
रविवारी सकाळी शहरातील गांधी मैदानावरून गोळा केलेला कचरा घेऊन जाणा-या ट्रक्टरची ट्राली झाकलेली नव्हती, यावेळी लक्ष्मीबाई कारंजा चौकात कच-याचे ओझे ट्रलीतून रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होते. या कच-याचे ओझे पडलेलं असल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी चालकासह पायी जाणा-यांना अडचण नसून खोळंबा यासारखी परिस्थिती गांधी मैदानावरील लक्ष्मीबाई कारंजा चौकात रविवारी झाली होती.