संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर जमावाने केलेल्या हल्ल्यात दत्तात्रय जाधव हा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १२) दुपारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बाबा बंगाली चौक येथे घडली. याबाबत झेंडीगेटचे प्रभाग अधिकारी मेहेर, लहारे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी संघटनेने बुधवारी (दि. १३) पासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी पञकारांशी बोलताना दिली.
बाबा बंगाली चौकातील अतिक्रमणे काढण्यात यावी, असा तक्रार अर्ज महापालिकेच्या अतिक्रमण विभागात आला होता. त्या अर्जाची दखल घेऊन अतिक्रमण काढण्याच्या कारवाई अतिक्रमण विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी केली. यात काही अतिक्रमणे पाडून झाली. यानंतरची अतिक्रमण पाडत असतानाच जमावाने मनपा अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या घडलेल्या घटनेची माहिती समजताच मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे घटनास्थळी आले, त्यांनी जखमी कर्मचाऱ्यांसह कोतवाली पोलिस ठाण्यास गेले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हल्ल्यामध्ये जखमी झालेले कर्मचारी जाधव यांना तीन टाके पडल्या या हल्ल्याचा संतप्त संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. बुधवारी महानगरपालिकेचे सर्व कामकाज बंद ठेवण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.