संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः टोळीप्रमुख मिक्या कांबळे व स्वप्नील शिंदे यांच्या टोळीविरुध्द मोक्का अंतर्गत जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.15 जुलै 2023 रोजी 10.15 वाजण्याच्या एकविरा चौक, अहमदनगर येथे यातील फिर्यादी यांचा मेव्हणा अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35, रा. पदमानगर अहमदनगर) यास नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यासोबत असलेल्या पूर्व वैमन्यातून वाद झाल्याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने दोन काळया रंगाच्या चारचाकी गाड्यामधून नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कु-हे, राजु फुलारी (सर्व रा. अहमदनगर) असे व त्यांच्यासोबत असलेले इतर 7 ते 8 लोकांनी येऊन नगरसेवक स्वप्निल शिंदे यांनी दिलेल्या चिथावणीवरुन त्यांच्या हातामधील लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे व महेश कुन्हे याच्या हातामध्ये बंदूक (गावठी कट्टा) घेऊन येऊन जोरजोरात आरडाओरडा करुन दहशत निर्माण करुन रोडने येणारे जाणारे व दुकानदारावर धाक निर्माण करुन अंकुश दत्तात्रय चत्तर यास डोक्यात जिवे मारण्याचे उद्देशाने जबर मारहाण करुन जखमी केले आहे.
बाळासाहेब भानुदास सोमवंशी (वय 42, रा. वांबोरी, ता.राहुरी, जि. अहमदनगर हल्ली रा. गावडेमळा, पाईप लाईनरोड, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं.1030/2023 भादविक 302, 326, 325, 324, 143, 147, 148, 149, 108, 341, आर्म अॅक्ट 3/25 मपोकाक 37(1)(3)/135 अन्वये गुरनं दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात स्वप्नील रोहिदास शिंदे (वय 40, रा वेदुवाडी सावेडी अहमदनगर), अभिजीत रमेश बुलाख (वय 33, रा गजराज फॅक्टरीजवळ सावेडी अहमदनगर), सुरज ऊर्फ मिक्या राजन कांबळे (वय 25, रा भुतकरवाडी, सावेडी, अहमदनगर), महेश नारायण कुन्हे (वय 28, रा. वाघमळा सावेडी अहमदनगर), अक्षय प्रल्हादराव हाके (वय 33, रा नंदनवन कॉलनी भिस्तबाग चौक सावेडी अहमदनगर), मिथून सुनिल धोत्रे (वय 23, रा.पवननगर सावेडी अहमदनगर), राजु भास्कर फुलारी(वय23,रा पवननगर अहमदनगर), अरुण अशोक पवार (वय 23, रा.मोरे चिडोरे वडारगल्ली ता. नेवासा जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आलेली आहे.
एलसीबीचे सपोनि गणेश वारुळे, पोउपनि मनोहर शेजवळ, पोना संतोष खैरे यांनी गुन्हयाचे तपासात अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्यामार्फतीने नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांना मोक्का कायद्यातील वाढीव कलम लावण्याची मंजुरी मिळणेकामी अहवाल सादर केला होता.
त्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील यांनी स्वप्नील रोहिदास शिंदे, अभिजीत रमेश बुलाख, सुरज ऊर्फ मिक्या राजन कांबळे, महेश नारायण कुन्हे, अक्षय प्रल्हादराव हाके, मिथुन सुनिल धोत्रे, राजु भास्कर फुलारी, अरुण अशोक पवार यांच्याविरुध्द मोक्का कायदयान्वये वाढीव कलम लावण्याची मंजुरी नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी दिली. ही कारवाई अहमदनगर एसपी राकेश ओला, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.