मंदिरातील त्रिशूळ चोरणाऱ्या आरोपी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : मंदिरातून चांदीचा त्रिशूळ चोरी करणाऱ्याला कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. चोरीचा त्रिशूल बाळगून असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने बागडपट्टी, तोफखाना येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. सिध्दीविनायक अपार्टमेंट, बागडपट्टी, अहमदनगर येथील वय ४९ वर्षे वयाचा आरेापी आहे.
कारवाई ही एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार पोहेकॉ तन्वीर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सलिम शेख, पोकाॅ अभय कदम, पोकाॅ सुजय हिवाळे, पोकाॅ अतुल काजळे यांच्या पथकाने केली आहे.
नगर अर्बन बॅंक चौकातील अमृतेश्र्वर मंदिरातून तीन हजार ८०० रुपये किमतीचा त्रिशूळ दि.१५ ऑक्टोबर २०२३ रोजी चोरीला गेला होता. याबाबत बाळु गंगाराम डहाळे (वय ६३ धंदा- पानटपरी, रा गोंधळलेगल्ली, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी एका आरोपीने केली असून तो त्रिशूळ बाळगून बागडपट्टी येथे असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. गुन्हे शोध पथकातील अंमलदार बागडपट्टी येथे सापळा लावून थांबलेले असताना एक इसम संशयास्पद उभा असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊच चौकशी केली असता चोरीचा त्रिशूळ मिळून आला. चोरीला गेलेला त्रिशूल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुकुंद दुधाळ करत आहेत.
सदर आरोपीचे हा मानसिक संतुलन बिघडले असून काही प्रमाणात मनोरुग्ण असल्याबाबत त्याचे नातेवाईकांनी कळविले असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.