भैरवनाथ देवस्थानाजवळ आता
प्रत्येक रविवारी कीर्तनसेवा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news Natwork
अहिल्यानगर, – आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ रविवारी (ता. ५) नवीन वर्षाच्या पहिल्या रविवार निमित्ताने १५१ अन्नदात्यांच्या हस्ते महाप्रसाद दिला जाणार आहे. या वेळी नवनिर्वाचित आमदारांची लाडुतुला होईल. तसेच यापुढे प्रत्येक रविवारी संध्याकाळी कीर्तन व महाप्रसाद अशी सेवा देण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेतला आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी पहाटे अभिषेक, आरती त्यानंतर नाश्त्याचा प्रसाद दिला जाईल. या वेळी डॉ. सतीश गिते यांना अन्नदान आरतीचा मान मिळाला आहे. या वेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते व आमदार काशिनाथ दाते यांची लाडूतुला होईल. देवस्थान व वरद नेत्रालयाचे संचालक डॉ. सागर बोरुडे, डॉ. स्मिता पटारे यांच्या सहयोगातून तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. १२ वाजता अन्नदात्यांच्या हस्ते महापूजा होईल. रात्री सात वाजता अक्षय उगले महाराजांचे कीर्तन होईल. या वेळी बाळासाहेब उकिर्डे यांना महाप्रसाद आरतीचा मान मिळाला आहे. यापुढे प्रत्येक रविवारी संध्याकाळी कीर्तनसेवा दिली जाणार आहे. या वेळीही उपस्थित भाविकांना अन्नदान केले जाईल. त्यामुळे वर्षभर कीर्तनमहोत्सव असलेले देवस्थान म्हणून ही नवीन ओळख देवस्थानाला मिळणार आहे. या निर्णयाचे ग्रामस्थांनी, भाविकांनी स्वागत केले आहे.