भुईकोट किल्ला येथे चैन स्नॅचिंग करणाऱ्यास पकडून १७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त ; ‘नगर एलसीबी’ कारवाई

भुईकोट किल्ला येथे चैन स्नॅचिंग करणाऱ्यास पकडून १७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त ; ‘नगर एलसीबी’ कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
भिंगार : भुईकोट किल्ला येथून चैन स्नॅचिंग करणारा आरोपीस पोलिसांनी पकडले‌. ९८ हजार ६०० रुपये किंमतीचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे. सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख (वय ५४, रा. सांजारोड, जाळी कारखान्यासमोर, धाराशिव मुळ रा. कासीम ब-ही दर्गा, पढेगांव, जि. संभाजीनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार सपोनि हेमंत थोरात, अंमलदार रविंद्र कर्डीले, विशाल दळवी, संदीप चव्हाण, संतोष लोढे, संदीप दरंदले, फुरकान शेख, चापोहेकॉ अरुण मोरे, अर्जुन बडे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर-पाथर्डी रोडने भूईकोट किल्ल्यासमोरुन जाताना कोणीतरी अनोळखी इसमाने गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीचे १७ ग्रॅम वजनाचे मिनीगंठण ओढून तोडून बळजबरीने चोरुन नेले, या धनश्री नंदकुमार सोनकांबळे (वय २९, रा. यशवंतनगर, डेअरी फार्म, चर्चजवळ, केकती, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५१/२०२४ भादविक ३९२ प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना रेकॉर्डवरील आरोपींच्या शोधा करीता पथक नेमून जिल्ह्यात घडलेल्या चैन स्नॅचिंगचे घटनांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोनि श्री. आहेर यांनी एलसीबी टिम’ला सूचना देऊन रवाना केले. एलसीबी टिम अहमदनगर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करताना पोनि श्री.आहेर यांना माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी टिम’ने लागलीच बेल्हेश्वर चौक, बु-हाणनगर रोड येथे जाऊन, सापळा लावुन थांबलेले असताना माहितीप्रमाणे एक संशयीत पायी चालत येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस पथकाची ओळख सांगून त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सलीम ऊर्फ सलीमोद्दीन अजोलोद्दीन शेख ( रा. सांजारोड, जाळी कारखान्या समोर, धाराशिव मुळ रा. कासीम ब-ही दर्गा, पढेगांव, जि. संभाजीनगर) असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात सोन्याचे दागिने मिळून आले. दागिन्याबाबत त्याच्याकडे विचारपुस करता त्याने भूईकोट किल्ल्यासमोर चैन स्नॅचिंग करुन चोरी केलेले सोने विक्री करीता घेऊन जात असल्याची माहिती दिली. आरोपीस ९८ हजार ६०० रुपये किंमतीचे १७ ग्रॅम सोन्याचे मिनीगंठणसह ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!