👉पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, नगर शहरासह भिंगारमधील विविध विषयांवर झाली चर्चा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – नगर शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी व ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर शहर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच नगरमधील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार हे निश्चित करण्यात आले. यावेळी आ. राम शिंदे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, अभय आगरकर, वसंत लोढा, सुवेंद्र गांधी, वैभव लांडगेसह इतर -पदाधिकारी उपस्थित होते.
भूषणनगर लिंक रोड ते कल्याण रोड या १२ कोटी रुपयांच्या कामाची स्थगिती उठवण्याचे आदेश तसेच मनपा हद्दीतील भूषणनगर पाच कोटी, इंडस्ट्रियल इस्टेट पाच कोटी व सिव्हिल हडको येथील पाच कोटी रुपये खर्चाच्या कामांना दिलेली स्थगितीही उठवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास खात्याच्या सचिवाला दिले आहेत. तसेच नगरमध्ये होणाऱ्या छत्रपती शिवराय राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.