संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – भिंगार छावणी परिषदेचा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मतीन सय्यद यांना यश आले आहे. परंतु वास्तविक हा नाक्याचा ठेका वसुलीसाठी भिंगार छावणी परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे मतीन सय्यद यांनाच दिला आहे. यामुळे येथे भ्रष्टाचार होणारच नसल्याचे बोलले जात आहे. सय्यद यांच्यावर भिंगारवासियांनी विश्वास दाखवित त्यांचा सत्कार केला आहे.
भिंगार छावणी परिषदेच्या हद्दीत असलेले प्रवेश पथकर नाके एक वर्षासाठी चालवण्यास घेतलेल्या ठेकेदाराने अवघ्या ४ महिन्यानंतर हे काम बंद केले १ लाख २८ हजार रुपयांच्या या ठेक्याच्या कामासाठी एन.एच. इंजीनियरिंग ठेकेदार संस्थेने ४ कोटी रुपयांची बोगस गॅरंटी दिली, मात्र या ठेकेदाराची ८० लाख रुपये अनामत रक्कम अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील एका जबाबदार अधिकार्याने या ठेकेदाराला तात्काळ परत दिली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मतीन सय्यद, शामराव वाघस्कर, पै.नईम शेख शिष्टमंडळ यांनी पुण्यातील कार्यालयाकडे प्रिन्सिपल डायरेक्टर यांच्याकडे पाठपुरावा केला व या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुण्याच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे छावणी परिषदेचा हा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढल्या संदर्भात सर्वपक्षीय भिंगारकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भारत पवार, संजय छजलानी, नूर शेख, प्रकाश घोरपडे, प्रदीप वाघमारे, आसिफ शेख, शिवम भंडारी, मतीन ठाकरे, दीपक लिपाने, शानू शेख, अतीक शेख, सचिन रोकडे, भारत ठोकळ, सागर कांबळे, आकाश बडेकर, शुभम शेरकर, अशोक कांबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.