भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांची पोलीस निरीक्षक पदावर बढती : भिंगार कॅम्प शांतता समितीतर्फे सन्मान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर: भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी योगेश राजगुरु यांची पोलीस निरीक्षक पदावर बढती झाल्याने भिंगार कॅम्प शांतता कमिटीकडून पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांचा सत्कार करुन शांतता कमिटी मधील सदस्य मतीन सय्यद,शामराव वाघस्कर,संजय सपकाळ,मार्गारेट जाधव,संतोष बोबडे व इतर सदस्य यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला केलेल्या चांगल्या कामाची प्रशंसा करुन त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला आपल्या सारखा खमक्या अधिकारी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच शांतता कमिटी सदस्य यांनी श्री.योगेश राजगुरु यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.कार्यक्रमासाठी गोपनिय शाखेचे पोहेकॉ.अजय गव्हाणे व स्टाप उपस्थित होता.