भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या सूचनेनुसार शहरातील शनिवारी (दि.२२ फेब्रुवारी २०२५) लाख भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पोनि सपोनि जगदीश मुलगीर यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिन पार पडला.
भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील तक्रार दिनात कौटुंबिक, शेजारी शेजारीचे वाद, शालीय प्रशासन यासह अनेक तक्रारारी आल्या होत्या. यावेळी पोनि जगदीश मुलगीर यांनी तक्रारदार व बिगर तक्रारदार या दोन्हीचेही म्हणणे ऐकून घेतले. काहींना सामोपचाराने तक्रार मिटविण्यात आल्या. यानंतर तक्रारदार व बिगर तक्रारदार यांच्या समेट करुन तक्रार निवारण करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे अनेक तक्रारदाराचे निवारण होऊन वाद मिटविण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. यावेळी पोलीस अंमलदार रवि टकले, दीपक शिंदे आदींसह पोलिस अंमलदारानी परिश्रम घेतले.