संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार असतानाही पोलिसांची नजर चुकवून वास्तव ठिकाणीच राहत असणा-या आरोपीला पकडण्याची कारवाई भिंगार कॅम्प पोलीसांनी केली आहे. शफीक अब्दुल रज्जाक मोगल (वय ३२, रा. यशवंतनगर, डेअरी फार्म, सैनिक नगर, भिंगार ता.जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाँ रेवननाथ दहीफळे, पोना राहुल द्वारके, पोकाँ अमोल आव्हाड, चापोकाॅ अरूण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मंगळवारी दि.१६ हे २०२३ ला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर एस मुंडे यांना माहिती मिळाली, उपविभागीय दंडाधिकारी,नगर भाग, अहमदनगर यांच्याकडील आदेश क्रमांक हद्दपार प्रस्ताव क्र.३१/२०२२ अहमदनगर दि.३१ मार्च २०२३ अन्वये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामधून दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे. असे असतानाही आदेशाचे उल्लंघन करून सैनिकनगर भागात आलेला आहे. या माहितीनुसार सपोनि श्री मुंडे यांनी भिंगार कॅम्प पोलिस टिम’ला सूचना दिल्या. टिम’ने खात्री केली. त्या संबंधित ठिकाणी तो पोलिसांना मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारचा त्याने त्याचे नाव शफीक अब्दुल रज्जाक मोगल असे सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजर केले. हद्दपार आरोपी मिळून आलेन त्याच्याविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गु र नं ३८९/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सफौ रमेश वराट हे करीत आहेत.