भिंगार कॅम्प पोलिस ठाणे : रात्री गस्तीत दुचाकी चोर पकडला

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालणार्‍या पथकाने बुर्‍हाणनगर रोडवरील गोंधळेमळा फाट्यावर चोरीची दुचाकी घेऊन फिरणार्‍यांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने पकडले आहे.

याबाबत रोहन सुनील पाटोळे (रा.बहिरवाडी, ता.नगर) असे या दुचाकी चोराचे नाव आहे. भिंगार पोलिस ठाण्यातील पो.हे.कॉ. पांडुरंग बारगजे, एस. एन. काळे हे बुधवारी (दि.२६) पहाटे २.३० च्या सुमारास पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त घालताना बुर्‍हाणनगर रोडवर गोंधळे मळा फाटा येथे त्यांना गर्दी दिसली. त्यांनी तेथे थांबून गर्दीतील भरत कर्डिले नावाच्या व्यक्तीला काय झाले म्हणून विचारणा केली. त्यावेळी त्याने आमचा मित्र विकी जाधव याचा गजराजनगर जवळ अपघात झाल्याचे कळाल्याने आम्ही येथे थांबलो असल्याचे सांगितले.

यावेळी त्या जमावातील एक तरुणाकडे विनाक्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी दिसली. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अगोदर आपले नाव रोहन सुनील गोर्डे असे असल्याचे खोटे सांगितले. त्याला अधिक विश्‍वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने रोहन सुनील पाटोळे असे खरे नाव सांगून दुचाकी पाथर्डी तालुक्यातील लोहसर खांडगाव येथील यात्रेतून १५ दिवसापूर्वी चोरल्याची कबुली दिली. त्याला पोलिसांनी अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १२४ सह भा.दं.वि.क. १७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अजय नगरे करत आहेत. कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस निरीक्षक प्रशांत खैरे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिनकर मुंढे ,उपनिरीक्षक निसार शेख, बी. एस. दिवटे, अजय नगरे, पांडुरंग बारगजे, अमोल आव्हाड, एस. एन. काळे, रेवणनाथ दहिफळे आदींच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!