भिंगार कॅम्प पोलिस ठाणे : बंदी असतानाही सुगंधीत तंबाखू बाळगणा-यास पकडले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर
: महाराष्ट्र राज्यात बंदी असतानाही विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर विक्री करण्याचे उद्देशाने सुगंधीत तंबाखू स्वतःचे कब्जात ठेवणा-यास पकडण्याची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे. रशीद बशीरभाई फकीर उर्फ फक-या (वय ४७, रा. जानकी कवडेनगर, पाण्याचे टाकीजवळ, आलमगीर ता.जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे, पोहेकाँ अजय नगरे, पोहेकाँ बीभिषन दिवटे, पोना राहुल द्वारके, पोना संदिप साठे, पोकाँ अमोल आव्हाड, मपोकाॅ रूपाली शेलार आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मिळालेल्या माहितीनुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि. दिनकर मुंडे यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याची टिम छापा टाकण्यासाठी रवाना केले. जानकी कवडे नगर, पाण्याचे टाकीजवळ, आलमगीर (ता. जि. अहमदनगर) येते एकजण हा त्याचे कब्जात त्याचे घराचे शेजारील पत्र्याचे शेडमध्ये ४७ हजार ५०० रु किं चे बारीक सुपारी प्रत्येकी २५ किलो ग्रॅम वजनाचे ५ पिस्ता रंगाच्या गोन्या त्यावर ५५५ DIAMOND GOLD असे लिहलेले प्रत्येकी ९ हजार ५०० रू प्रमाणे, ८ हजार रू किं.च्या प्रत्येकी अंदाजे १० किलो ग्रॅम वजनाच्या ४ पांढ-या रंगाच्या गोण्यामध्ये सुगंधी तंबाखू प्रत्येकी २हजार 2 रू प्रमाणे ११ हजार ७०० रू किं च्या ९ प्लॅस्टीक पुडे प्रत्येकी अंदाजे ५ किलो ग्रॅम वजनाच्या गोल्डन रंगाचे पाकीट त्यावर ५ Kg (net weight) असे लिहलेले सुगंधी तंबाखू अंदाजे १३०० रू प्रमाणे, २ हजार ८०० रू किं चे सुट्टे काळे रंगाचे प्लॅस्टीकचे १४ पाकीटे अंदाजे अर्धा किलो वजनाचे प्रत्येकी २०० रू प्रमाणे, १२ हजार रू किं चा एक काळे रंगाचा realme कंपनीचा अँन्ड्रॉईड मोबाईल जु.वा. कि. अं. असा एकूण ८२ हजार रू. चा मुद्देमाल रशीद बशीरभाई फकीर उर्फ फक-या याच्याजवळ मिळून आला. रशीद बशीरभाई फकीर उर्फ फक-या व मुद्देमाल भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आणून त्याच्याविरूद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गु र नं १६६/२०२३ भादवि कलम १८८,२७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ विलास गारूडकर हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!