संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणा-यास चोरट्याला पकडून मुद्देमाल हस्तगत केला. तो हस्तगत मुद्देमाल संबंधित मालकास कायदेशीर कार्यवाही करुन तो पुन्हा मिळवून देण्याची कामगिरी भिंगार कॅम्प पोलीसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांच्या सूचनेनुसार पोसई किरण साळुंके, सफौ आर एस वैरागर आदिंनी कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१५ जानेवारी २०२३ रोजी ३.५० वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब फिरोदीया वृद्दाश्रम समोरून गळ्यातील २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र काळ्या मण्यामध्ये ओवलेले ४ ग्रॅम वजनाचे त्यात एक पळी, दोन मोठे व ४४ लहान सोन्याचे गोल मनी ओढून चोरून नेले., याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुर नं २४/२०२३ रोजी भादवि कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासादरम्यान आरोपी रियाज फैय्याज इराणी (वय ४० रा. वॉर्ड नं १, नवीन कोर्टासमोर, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर) यास अटक करून त्याच्याकडून सोन्याचे गंठण व मनी जप्त करण्यात आले होते.
ते न्यायालयाच्या आदेशाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांनी फिर्यादी महिलेस बोलावून त्यांचे ताब्यात त्यांचे चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र काळ्या ताब्यात देण्यात आले.