संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : गोमांस विक्री प्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा पोहेकाॅ बापूसाहेब म्हस्के यांनी तपास करुन अटक आरोपी अब्दुल कदिर चौधरी व सलीम अकबर चौधरी याना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २५ दिवस साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने मंगळवारी (दि.२८) ला सुनावली.
यावेळी सरकारी वकील पटेकर यांनी काम पाहिले. पैरवी हेकाॅ.नितीन गायकवाड व मपोकाॅ रुपाली शेलार यांनी मदत केली.
दि.१२ नोव्हेंबर २०२२ ला मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर एलसीबी टिम’ने मुकुंदनगर छोटी मरियम मस्जिदीच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल करून मांस तोडताना अब्दुल कदिर चौधरी (वय १९, रा.नालबंद खुंट, अहमदनगर) पकडण्यात आले. यावेळी सलिम अकबर चौधरी हा फरार झाला होता. अब्दुल चौधरी याला अटक करुन १५० किलो वजनाचे ३० हजार रुपयांचे गोमांस, २० हजार रुपये किंमतीचे गोवंशी जातीचे वासरे व २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याबाबत एलसीबीचे पोना विशाल गंवादे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंविक २६९, ३४ महाराष्ट्र पशुसंरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(क)९ प्रमाणे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अब्दुल कदिर चौधरी व फरार सलिम अकबर चौधरी या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा अधिक तपास लावून अटक असणारा आरोपी अब्दुल कदिर चौधरी याला व फरारी असणारा सलिम अकबर चौधरी या दोघांना न्यायालयासमोर हजर केले होते.