संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter
अहमदनगर : कापूरवाडी शिवारात दोन ठिकाणी गावठी हातभट्टीवर छापा टाकून ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्याची कारवाई भिंगार कँप पोलीसांनी केली.
एसपी राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस सपोनि दिनकर मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई एम के बेंडकोळी, पोहेकाँ अजय नारायण नगरे, पोहेकाँ आर के दहीफळे, पोहेकाँ आर.एस.मिसाळ, पोना जी एस साठे, पोना आर आर द्वारके, पोना दिलीप शिंदे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार भिंगार कॅम्प पोलिस टिम’ने कापुरवाडी शिवार येथील भाऊसाहेब मुरलीधर पवार (वय 62 वर्षे रा. कापुरवाडी ता. जि. अहमदनगर) यांच्या राहत्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे आंबट उग्र वासाचे कच्चे रसायन जप्त केले. तर दुसऱ्या ठिकाणी संतोष गोवर्धन पवार (वय ३६ रा. ब्रम्हतळे,कापुरवाडी शिवार, ता. जि. अहमदनगर) याच्या राहत्या घराच्या आडोशाला छापा टाकला, यात गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे आंबट उग्र वासाचे कच्चे रसायन जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. या कारवाई एकूण ७१ हजार रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईत भिंगार कॅम्प पोलीसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.