संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अवैध देशी व विदेशी दारूची वाहतूक करणा-या दुचाकीसह एकूण ६९ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली. मोहन शंकर गुंजाळ ( रा. कोल्हेवाडी फाटा, सारोळा बद्दी, जामखेड रोड, ता. नगर जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर डिवायएसपी अनिल कातकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि दिनकर मुंडे यांच्या सूचनेनुसार पोना संदिप साठे, पोना राहुल द्वारके, पोकाँ अमोल आव्हाड, पोकाॅ सागर तावरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१ एप्रिल २०२३ ला मोहन शंकर गुंजाळ (वय ३८, रा. कोल्हेवाडी फाटा, सारोळा बद्दी, जामखेड रोड, ता. नगर जि. अहमदनगर) याला देशी,विदेशी दारूची वाहतूक करताना पकडले होते. त्याच्या ताब्यातून एक पांढरे रंगाची होंडा कंपनीची अँक्टीवा ६ जी मॉडेलची मोपेड गाडी तीचा आरटीओ ( एमएच १६ सी एक्स ५२५२ तसेच देशी व विदेशी दारू असा एकूण ६९ हजार २८० रुपये किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, असा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुरनं १८३/२०२३ म प्रो का क ६५(ई), ८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोहेकाँ गोपिनाथ गोर्डे हे करीत आहेत.