संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेत औरंगाबादच्या देवमुद्रा स्कुल आँफ इव्हेंट यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.६) विद्यार्थ्यांनी गरबा दांडियाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी दांडिया स्पर्धेतील विद्यार्थीनींनी आकर्षक वेशभूषा केली होती.
दरम्यान चित्रकला,सेल्फि विथ गणेशा, गीतगायन, नृत्य या स्पर्धेतील विजेत्यांना देवमुद्रा स्कुल आँफ इव्हेंट यांच्यावतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, बोर्डचे उपाध्यक्ष वसंत राठोड, स्वच्छता निरिक्षक रमेश साके, गणेश भोर, देवमुद्रा ग्रुप औरंगाबादच्या संचालिका सौम्यश्री पवार ,शुभांगी कुलकर्णी, कुलकर्णी, प्रा.जयंत शेवतेकर, मुख्याध्यापक संजय शिंदे व राजेद्र भोसले,मुबीना सय्यद आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष भारूड यांनी केले. आभार अरविंद कुडिया यांनी मानले.
यावेळी शाळेच्या मैदानावर प्रथमच सौम्यश्री पवार,शुभांगी कुलकर्णी, स्नेहल लवांडे,मनिषा गोरे,सना खान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थींर्नीनी आकर्षक गाण्याच्या तालावर दांडिया गरब्याचा ठेका धरला होता. या कार्यक्रमास कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेतील शिक्षकवृंद, पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.