अहमदनगर, औरंगाबाद,पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील वाहन प्रवेश कर अखेर बंद
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील वाहन प्रवेश कर बंद झाला आहे. अहमदनगर, औरंगाबाद व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत हा वाहन प्रवेश कर केंद्र सरकारने रद्द केला आहे. यामुळे तिन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत मंगळवारी (दि.११) रात्री १० वाजल्यानंतर वाहन प्रवेश कर घेणे अधिकृतपणे बंद झाला आहेत.
याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड सीईओ मोरे यांच्याशी संपर्क साधला असता,वाहन प्रवेश कर घेणे बंद झाले आहे. तसे गॅझेट निघाले असून, अद्यापपर्यंत ते आम्हाला आलं नाही, असेही त्यांनी म्हणत वाहन प्रवेश कर घेणे बंद बाबत दुजारा दिला आहे.
देशातील यापूर्वी सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत व्हीएएफ हा केंद्र सरकारने बंद केला आहे. परंतु व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा असल्याने तो चालू होता. या कायद्यामुळे स्थानिक नागरिकांसह रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अथवा अडचणी येत होत्या. त्याबाबत तश्या केंद्र सरकारच्या संबंधित विभागाला तक्रारी गेल्या होत्या. तक्रारींच्या असल्याने व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा केंद्र सरकारला बंद करायचा होता. त्यानुसार व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा रद्द करुन दि.११ एप्रिल २०२३ च्या रात्री १० वाजण्याच्या सुमारास केंद्र सरकारने गॅझेट प्रसिद्ध केले आहे. केंद्र सरकारने ही सर्व प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित कॅन्टोन्मेंट बोर्डला अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यानुसार अहमदनगर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड मानद सदस्य वसंत राठोड यांनी नागरिकांच्या हितासाठी हा व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा रद्द ताबडतोब रद्द अथवा बंद झाला पाहिजे, असा अभिप्राय केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. पण यानंतरही भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत व्हिएटी (वाहन प्रवेश कर) हा लोकल कायदा सुरू ठेवून टोलनाके सुरूच होती. आताही सर्व अहमदनगर, औरंगाबाद व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत व्हिएटी (वाहन प्रवेश कर) वसुली करणारे टोलनाके केंद्र सरकारने बंद केले आहे. तसे तिन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्वतंत्र गॅझेट प्रसिद्ध केले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.