👉न्यायालयीने प्रक्रियेत अडकली निवडणूक ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर संरक्षण मंत्रालयाने जारी केली अधिसूचना
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. अनेक ठिकाणी छावणी परिषदेत समाविष्ट होण्यास रहिवाशांनी विरोध केला आहे.. याबाबत सर्वोच्च न्यायालयात हरकत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने याबाबतच्या हरकतींचा निपटारा करण्याचे निर्देश केंद्रीय संरक्षण मंत्रालयाला दिले आहेत. त्यानुसार केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आज दि. १७ रोजी अधिसूचना काढून भिंगारसह देशभरातील जाहीर झालेल्या सर्व ठिकाणच्या कॅन्टोन्मेंट निवडणुकांना स्थगिती दिली आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिनांक १७ फेब्रुवारी रोजी देशभरातील ५२ ठिकाणच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक जाहीर केली होती. त्यात भिंगारसह महाराष्ट्रातील १३ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे.