भिंगार अर्बन बँक निवडणूक :  भृंगऋषी पॅनेलचे १५ पैकी १५ उमेदवार मोठ्या मतांनी विजयी

भिंगार अर्बन बँक निवडणूक :  भृंगऋषी पॅनेलचे १५ पैकी १५ उमेदवार मोठ्या मतांनी विजयी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर भिंगार अर्बन बँकेवर भृंगऋषी पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. भिंगार अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रविवारी मतदान झाले. यामध्ये ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६ हजार ९८९  पैकी ४ हजार ७४९ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत विद्यमाने चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंगऋषी पॅनेल व माजी चेअरमन स्व.गोपाळराव झोडगे यांच्या पत्नी शारदाताई झोडगे यांच्या नेतृत्वाखाली बेलेश्वर पॅनलने उमेदवार उभे केले होते.
रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इंद्रायणी लॉन येथे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली. यामध्ये भृंगऋषी पॅनेलचे १५ पैकी १५ उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले.

विजय उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण गट – कैलासराव खरपुडे (२ हजार ८२५), माधव गोंधळे (२ हजार ९२०), किसनराव चौधरी (३ हजार १४०), महेश झोडगे (३ हजार ३०३), कैलास दळवी (२ हजार ७४७), अमोल धाडगे (२ हजार ९४७), राजेंद्र पतके (२ हजार ७९३), विष्णू फुलसौंदर (२हजार ९१२), रुपेश भंडारी (२ हजार ८२०), कैलास रासकर (२ हजार ६२९). इतर मागावर्गीय – अनिलराव झोडगे ( ३‌हजार ३०१). वि.जा.भ.ज. – नामदेव लंगोटे (३ हजार ३७५), अनुसूचित जाती-जमाती – एकनाथ जाधव (३ हजार १४७), महिला राखीव – तिलोत्तमा करांडे (२ हजार ५८३), अनिता भुजबळ (२ हजार ९४६) ही विजयी उमेदवार झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!