भिंगारला तिरट जुगार खेळणाऱ्यांवर भिंगार पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : तिरट जुगार खेळणा-यांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी छापा टाकून ६३ हजार ६०० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार पोसई किरण साळुंके,व पोलीस अंमलदार संदिप घोडके, दिपक शिंदे, समीर शेख . अमोल आव्हाड, संदिप थोरात, कैलास शिरसाठ आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१७ फेब्रुवारी २०२४ भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांना माहिती मिळाली की, भिंगार शहरातील पाटीलगल्लीतील हरबा वाडयात काहीजण हे एकत्र बसून पैशांवर तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत आहेत, आता गेल्यास मिळून येतील.
या माहितीवरून सपोनि श्री राजगुरु यांनी तात्काळ पोलिस पथकाला सूचना दिल्या. माहिती ठिकाणी पोलिस पथकाने छापा टाकला, या दरम्यान पाचजण हे गोलाकार एकत्र बसून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले, यावेळी पोलिसांनी पाचजणांना जागीच पकडून त्यास त्यांचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे प्रवीण सुनिल पॅडुलकर (वय २५ पाटीलगल्ली, भिंगार अहमदनगर), आकाश अरुण थोरात (वय २५, रा पाटीलगल्ली भिंगार अहमदनगर), तेजस रघुनथ पाडळे (वय२६, रा. भिमनगर भिंगार अहमदनगर), शिवा राजु सदलापुरकर (वय २७, रा मुळेगल्ली भिंगार अहमदनगर), अविनाश कुमार व-हाडे (वय ४५, रा पाटीलगल्ली भिंगार अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. या सर्वांकडून एकूण ६३ हजार ६०० रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्वांवर पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवजयंती निमित्ताने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील ७६ गुन्हेगारांना केले हद्दपार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
सोमवारी दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) उत्सव साजरा होत आहे. या कालावधीत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था प्रश्न् निर्माण होईल त्याअनुषंगाने क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम १४४(२) प्रमाणे अहमदनगर शहराच्या भौगोलिक हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीनिमीत्त भिंगार शहरातील शांतता अबाधित राहावी. म्हणून शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) उत्सवा दरम्यान दि.१९ रोजीचे १ वाजता ते दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजीचे सकाळी ६ वाजेच्या या कालावधीत भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ७६ गुन्हेगारांना प्रवेश बंदी केल्याबाबतचा आदेश नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी पारित केला आहे.