भारतात डिजिटल युगाची सुरुवात प्रमोद महाजन यांनी केली – भैय्या गंधे

स्व.प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने अभिवादन

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- 
देशात डिजिटल युगाची सुरुवात तत्कालीन केंद्रीयमंत्री ना.प्रमोद महाजन यांनी केली. एक प्रभावी वक्ता,  पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती होती. भारतीय जनता पाटीच्या विविध पदावर काम करतांना त्यांनी भाजपाला तळगाळापर्यंत पोहचविण्याचे काम केले. केंद्रीय मंत्रीमंडळात विविध विभागाचा कारभार सांभाळतांना देशवासीयांसाठी अनेक योजना राबवून सर्वसामान्यांना आधुनिक बनविले. जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ते ताईत होते. सहकारी पक्षांना बरोबर घेऊन त्यांच्यात समन्वय साधण्याचे महान काम त्यांनी करुन विविध राज्यात भाजपा युतीची सत्ता आणली. त्याच्या दूरदृष्टीमुळेच आज आपण डिजिटल युगात वावरत आहोत. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला त्यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी राहतील, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.

     भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, सरचिटणीस तुषार पोटे, उपाध्यक्ष संतोष गांधी, शिवाजी दहीहांडे, गणेश साठे, डॉ.ज्ञानेश्वर दराडे, शशांक कुलकर्णी, चिन्मय खिस्ती, वंदना पंडित आदि उपस्थित होते.
     याप्रसंगी संतोष गांधी म्हणाले, स्व.प्रमोद महाजन हे एक वेगळे व्यक्तीमत्व होते, त्यांच्या कार्यशैलीने अनेक समाजोपयोगी निर्णय घेऊन त्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले. भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्षाचे देशभर जाळे निर्माण केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भाजपाच्या सत्ता काळात घेतलेली निर्णय आज फलदायी ठरत आहेत. अशा नेत्याचे स्मरण कायम सर्वांच्या मनात राहल, असा विश्वास व्यक्त केला.
   यावेळी हुजेफा शेख, सिद्धेश नाकाडे, अभिषेक वराळे, प्रणव सरनाईक, डॉ.विश्वजित देशपांडे, ज्ञानेश्वर धिरडे, रविंद्र काकणे, सुदाम वैरागर, मनोज काळे, बाबासाहेब तागड, राजेश हजारे, व्यंकटेश ओमादंडी, विनायक बडे, ऋग्वेद गंधे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी तुषार पोटे यांनी आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!