👉पहिल्याच दिवशी भविकांची अलोट गर्दी ; भाविकाना दिला पूरणपोळीचा प्रसाद
बाळासाहेब खेडकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव : श्रीक्षेत्र भगवान गडाचा ८९ .वा फिरता नारळी सप्ताह भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मौजे भारजवाडी येथे मोठया उत्सहात भाविक भक्तांच्या उपस्थीत सुरुवात झाली आहे. यावेळी मोठया संख्येने भावीक भक्त उपस्थित होते.
भगवानगडाचे श्री संत भगवानबाबांनी सुरू केलेला ८९ वा फिरता नारळी सप्ताह यावर्षी पाथर्डी तालुक्यातील मौजे भारजवाडी येथे होत असल्याने गुढी पाडव्या पासून प्रत्येक घरावर गुढी उभारली गेली आहे. ती गुढी सप्ताहाच्या सांगता समारंभपर्यंत राहणार आहे.
मंगळवार भारजवाडी ग्रामस्थानी भगवानगडावर जाऊन गडाचे महंत डॉ नामदेव शास्त्रीजी यांची भगवानगड ते भारजवाडी सवाद्य भव्य मिरवणूक व महिलांनी डोहीवर कलश घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात भव्यदिव्य शोभयात्रा काढत सप्ताह स्थळी आगमन झाले. भगवान गडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी यांच्या हस्ते भगवानबाबाच्या प्रतिमेचे पुजन व टाळ विणा मुदंग यांचे पूजन झाले. त्यानतंर श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पवृष्टी अर्पण करुन ८९ व्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला आहे. शिरूर कासार येथील सिध्देश्वर संस्थान चे महंत विवेकानंद स्वामी यांच्या हस्ते गाथा पूजन संपन्न झाले.
या सप्ताह प्रारंभ झाला, पुष्पवृष्टी प्रसंगी भगवान गडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी सिध्देश्वर सस्थांनचे मठाधीपती विवेकांनद शास्त्री येळेश्वर सस्थांन चे मठाधिपती रामगिरी महाराज, भालगाव सस्थांनचे नवनाथ महाराज गाडे, मिडसागांवी येथिल सालसिधेश्वर सस्थांनचे मठाधिपती हनुमान सातपुते तागडगाव येथिल भगवानबाबा सस्थानचे मठाधीपती अतुल शास्त्री हरिश्चंद सस्थांनचे भगवान महाराञ राजपुत
एकनाथवाडी येथिल निरजंण सस्थांन चे मठाधीपती कृष्णा महाराज व ज्ञानेश्वरी विद्यपिठामधील आजी माजी विद्याथी व मान्यवर उपस्थीत होते तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशकंर राजळे बीड जिल्हा मधील सुशिला मोराले प्रा . दादासाहेब मुंढे उपस्थित होते —————–