संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी पारनेरचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पञ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांंत पाटील यांनी श्री कोरडे यांना भाजपाचे मुंबई येथील नरीमन पॉंईट येथील प्रदेश कार्यालयात दिले आहे. या दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा भानुदास बेरड हे उपस्थित होते.
श्री कोरडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल स्व पक्षाचे खा.डाॅ.सुजय विखे पा., आमदार मोनिकाताई राजळे, माजीमंञी बबन पाचपुते, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड आदिंसह माजीमंञी शिवाजी कर्डीले आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी प्रा बेरड म्हणाले, श्री कोरडे यांच्या नियुक्तीने त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. पारनेर तालुक्यात पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.