संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : भाजपाच्या नेत्या तथा माजीमंञी पंकजा मुंडे यांना पक्षाकडून छुप्याविरोधामुळे डावले जात असल्याने मुंडे कार्यकर्ते संतापले आहेत. यात पाथर्डी तालुक्यात कट्टर समर्थक याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर संतप्त कार्यकर्त्याच्या भेटीसाठी पाथर्डी दौ-यावर पंकजा मुंडे या आल्या असता, कार्यकर्त्याशी चर्चा केली, यानंतर त्यांनी मोहाटदेवीचे दर्शन घेत, त्या आष्टीला कार्यकर्ता मेळाव्याला जाताना चिंचपूर पांगुळ येथे पंकजा मुंडे थांबल्या. यावेळी चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, या दरम्यान मुंडे यांनी ग्रामस्थांशी औपचारिक चर्चा केली.
“यावेळी मोहटादेवी याठिकाणी मुंडे यांच्यावर जेसीबी द्वारे फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा स्वागत कमानी उभारल्या गेल्या होत्या. या दौऱ्याचे नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केल्याने भाजप नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे यांच्यासह कार्यकर्त्याचे पंकजा मुंडे यांनी तोंड भरून कौतुक केले.”
यावेळी रामहरी खेडकर, अहमदनगर भाजपाचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच धनंजय बडे, रमेश ढाकणे, चिंचपूर पांगुळ सोसायटीचे सचिव दगडू बडे, पत्रकार सोमराज बडे, तुकाराम बडे, सौ सुमनताई खेडकर, दादासाहेब बारगजे, रावसाहेब गिते, आजिनाथ बडे, डॉ.अशोक बडे, गहिनीनाथ बडे, नामदेव बडे, गणेश पेंटर, सोमराज बडे, प्रकाश बडे, विष्णू बडे, बाबासाहेब वामन बडे, अशोक बडे मुकादम, रावसाहेब बडे, सुरेश आव्हाड, तुकाराम बडे, सुनील खाडे, सोनाजी बडे, पोपट दशरथ बडे, अंबादास राजगुरू, माचिंद्र खंडागळे, विक्रम साखरे, लक्ष्मण साळवे, जगूतात्या बडे, केशव केदार, संजय बारगजे, लक्ष्मण बडे, साहेबराव रंधवे, बाबूवायरमन, अशोक पोफळे, भिमराव बडे, मुरलीधर बडे, अक्षय बारगजे आदिंसह जोगेवाडी, मानेवाडी, ढाकणवाडी व वडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉@संकलन : सोमराज बडे(पत्रकार)