भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी शेतकरी नेते ढाकणे

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी शेतकरी नेते ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील पागोरी पिंपळगांव येथील रहिवाशी शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या कार्याची दखल घेऊन अहमदनगर दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व भाजपा किसान मोर्चा अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील यादव यांनी शेतकरी नेते ढाकणे यांची भाजपा किसान मोर्चा अहमदनगर दक्षिण जिल्हा सरचिटणीसपदी तिसऱ्यांदा निवड केली आहे.
शेतकरी नेते ढाकणे यांनी आपल्या कार्याकाळामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमधील झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळून देण्यासाठी सरकार दरबारी व वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्याला सरकार दरबारी न्याय मिळून देण्याचे शेतकऱ्यांच्या बांधावर हे अभियान खूप गाजले त्यांची दखल घेऊन भाजपा पक्ष श्रेष्ठींनी शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांची तिसऱ्यांदा भाजपा किसान मोर्चा अहमदनगर दक्षिण जिल्हा सरचिटणीसपदी निवड केली आहे.
शेतकरी नेते ढाकणे यांच्या निवडीबद्दल महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री प्रा.राम शिंदे, खा. सुजय विखे, आ. मोनीकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,भाजपा अहमदनगर दाक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजपा प्रदेशचिटणीस अरुण मुंडे, भाजपा किसान मोर्चा अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील यादव , भाजपा ओबीसी मोर्चा अहमदनगर दक्षिण अध्यक्ष गोकुळ दौंड, पाथर्डी तालुका भाजपा अध्यक्ष मृत्युंजय गर्जे, शेवगांव तालुका भाजपा अध्यक्ष तुषार वैद्य व भाजपा अहमदनगर दक्षिण पदाधिकारी ,पाथर्डी भाजपा व भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!